भारत-इंग्लंड कसोटी सामने ‘तेंडूलकर-कूक ट्रॉफी’साठी खेळवा : मोंटी पानेसरची सूचना

Monty Panesar

भारत आणि इंग्लंडदरम्यान ( India vs England) खेळली जाणाऱ्या कसोटी मालिका ‘तेंडूलकर-कूक ट्रॉफी’ (Tendulkar-Cook trophy) या नावाने खेळली जावी अशी सूचना इंग्लंडचा माजी कसोटीपटू मोंटी पानेसर (Monty Panesar) याने केली आहे. मोंटीने इंग्लंडसाठी ५० कसोटी आणि २६ वन डे सामने खेळले आहेत.

मोंटीने हा प्रस्ताव मांडताना म्हटले आहे की, सचिन तेंडुलकर व ॲलिस्टर कूक या दोघांनी आपआपल्या देशासाठी सर्वाधिक धावा केलेल्य आहेत, ते दोघे एकमेकांविरुध्द भरपूर वेळा खेळले आहेत आणि सचिन तेंडूलकर हा किती महान खेळाडू आहे हे सर्वांनाच माहिती आहे मात्र त्याच्या नावाने अजून एकही मालिका नाही. त्यामुळे सचिनच्या नावाने एक तरी मालिका असायला हवी असे मत त्याने मांडले आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची कसोटी मालिका ही याच धर्तीवर बोर्डर-गावसकर ट्रॉफी अशी खेळली जाते.

दरम्यान, मोंटीने भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीबद्दलही आपले मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते भारताने इंग्लंडविरुध्दचा दुसरा कसोटी सामनासुध्दा गमावला तर विराट बुहधा कर्णधारपद सोडेल. चेन्नई कसोटीतील पराभव हा विराटच्या नेतृत्वातील भारताचा सलग चौथा पराभव होता आणि अलीकडे ऑस्ट्रेलियात व एरवीसुध्दा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेने अतिशय चमकदार कामगिरी केल्याने विराट कोहलीवर दडपण वाढले आहे.

मोंटीने म्हटले आहे की विराट हा अतिशय सफल फलंदाज आहे याबद्दल वाद नाही पण त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी चांगली झालेलू नाही. त्यामुळे तो दडपणात आहे आणि अजिंक्य रहाणेच्या कर्णधार म्हणून यशाने त्याच्यावरील हे दडपण अाणखी वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER