भारतात एकदा नव्हे तर तीन वेळा आणीबाणी करण्यात आली होती घोषित!

Maharashtra Today

आणीबाणीचा विषय निघाला की आपल्या समोर येतं १९७५ हे वर्ष. भारताच्या लोकशाहीला लागलेला सर्वात मोठा डाग अशी आणीबाणीची ओळख आहे. भारतात पहिल्यांदा आणीबाणी भारतात १९७५ ला लागली असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. याच्या आधीही भारतानं आणीबाणी (state of emergency) पाहिली आहे.

चीननं केला विश्वासघात

आपल्या देशात तीन वेळा अशी परिस्थीती निर्माण झाली होती जेव्हा राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा करावी लागली होती. सर्वात आधी आणीबाणी लागली होती १९६२ मध्ये. जेव्हा भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. १९६२ ला सुरु झालेला हा आणीबाणीचा कालावधी १९६८ पर्यंत राहिला. भारत आणि चीन एकाच वेळी परराष्ट्रांच्या गुलामीतून मुक्त झाले. त्यामुळं एकमेकांच्या विकासानं प्रगती करण्याची संधी दोन्ही राष्ट्रांनी हेरली होती. ‘हिंदी- चीनी भाई भाई’ (Hindi- Chini Bhai Bhai) म्हणत दोन्ही राष्ट्रांमध्ये मैत्रीचे गोडवे गायले जात होते. भारतातल्या प्रत्येकाच्या ओठांवर हा नारा होता.

परंतू चीनच्या मनात काही वेगळीच योजना होती. आजही हा नारा दिला जातो पण त्यातून एक उपहास साधायचा असतो. मैत्रीचे गोडवे गाणाऱ्या आणि एकमेकांवर स्तूती सुमनं उधळणाऱ्या या दोन्ही राष्ट्रांना लवकरच युद्धासाठी एकमेकांसमोर उभं ठाकावं लागणार होतं आणि याला कारण ठरलं चीननं केलेला विश्वासघात. नेहरुंनी युद्धाच्या काही दिवसाआधी चीनमध्ये चीनचे नेते ‘माओ’ यांची भेट घेतली होती. तेव्हा परिस्थीती सामान्य होती परंतू नेहरु जसे भारतात परतले युद्धाला तोंड फुटलं.

युद्धाचं कारण ठरलं भारत आणि चीनमधला सीमावाद. हिमालयाच्या सीमेवरुन दोन्ही राष्ट्र एकमेकांच्या विरोध करत होती. चीननं भारतीय सीमेतील महत्त्वाच्या अक्साई चीन आणि अरुणाचलप्रदेशावरील काही भागावर स्वतःचा अधिकार सांगायला सुरुवात केली. परंतु भारताला हे मंजूर नव्हतं. शिवाय १९५९ मध्ये चीनविरोधात तिबेटच्या विद्रोहानंतर भारतानं बौद्ध धर्मगुरु ‘दलाई लामा’ यांना शरण दिली होती.

अशातच २० ऑक्टोबर १९६२ ला लदाखच सीमेवर अचनाक चीननं हल्ला केला. यामुळं युद्धाला तोंड फुटलं परिस्थीती हातातून बाहेर जाऊ नये म्हणू राष्ट्रपतींनी २५ ऑक्टोबर १९५२ ला आणीबाणीची घोषणा केली. तिथून पुढं १० जानेवारी १९६८ पर्यंत ही आणीबाणी लागू होती. युद्ध संपल्यानंतरसुद्धा आणीबाणी कायम का ठेवली गेली असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर पाकिस्तान युद्धात आहे. चीनकडून भारताचा पराभव झाला. या पराभवातून भारत सावरत होता तितक्यात पाकिस्ताननं १९६५साली भारतावर आक्रमण केलं. त्यामुळं आणीबाणीचा कालावधी वाढवण्यात आला.

७१ नंतर पुन्हा युद्धाला फुटलं तोंड

पाकिस्ताननं भारताला १९६५च्या युद्धात मागं ढकललं. याचा वचपा काढण्याची तयारी भारतीय सैन्याची होती, योग्य संधीची वाट सारेच बघत होते. वर्ष १९७१ मध्ये भारतीयांना ही संधी मिळाली. यातूनच बांग्लादेश जन्माला आला. या युद्धाचं कारण होतं पाकिस्तानी सरकारांच स्वतःच्याच देशाशी असलेलं अन्यायकारी वागणं. पाकिस्तानी सरकार त्यांच्याच पुर्व पाकिस्तानावर जे आज बांग्लादेश म्हणून ओळखलं जातं त्यावर अमानवी अन्याय अत्याचार करत होतं. बालकांचे बळी जात होते. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांनी सर्व सीमा पार केल्या होत्या. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध पुर्व पाकिस्तानात बंडाला तोंड फुटलं.

तत्कालीन पतंप्रधान इंदिरा गांधींनी चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. संयुक्त राष्ट्र संघनेत मुद्दा मांडला. काहीच परिणाम झाला नाही. शेवटी कृती करणं भाग होतं. पाकिस्ताननं २ डिसेंबर १९७१ ला भारतावर हल्ला केला. यावेळी भारताला स्वतःला संकटापासून वाचवायचं होतं. १९७१ ला पुन्हा आणीबाणीची घोषणा करण्यात आली. ३ डिसेंबर १९७१ला आणीबाणी लागू झाली. भारतानं संधी साधली, युद्ध तर जिंकलंयच पण बांग्लादेश नावाचं नवं राष्ट्र जन्माला घालण्यात सिंहाची वाटा उचलला.

तिसरी आणीबाणी

‘गरिबी हटाओ’, ‘मॉं दुर्गेचा अवतार’ पासून ते ‘भारत की बेटी’ म्हणून इंदिरा प्रसिद्ध होत्या. संपूर्ण देशात त्यांची लोकप्रियता होती परंतू २५ जून १९७५ च्या मध्यरात्री त्यांनी ‘आणीबाणी’ची घोषणा केली. हायकोर्टानं त्यांचा रायबरेलीतला लोकसभा सिटचा विजय अवैध ठरवला. तिकडं जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानावर मोठी रॅली काढली. ‘संपुर्ण क्रांती’ असं त्यांच्या रॅलीचं नाव होतं.

इंदिरांनी हाताबाहेर जाणारी परिस्थीती हेरली आणि कलम ३५२ नूसार देशात आणीबाणी लागू केली. यानंतर जे घडलं ते कुणापासून लपलं नाही. अनेक लहानमोठ्या पुस्कातून या आणीबाणीबद्दल बोललं गेलंय. २१ मार्च १९७७ला आणीबाणी मागं घेण्यात आली; पण इंदिरांच्या उज्वल राजकीय कारकिर्दीवर आणीबाणी एका डागाप्रमाणं असल्याचं अनेक जण सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button