देशभरातील ५४ लाख ८७ हजार ५८१ करोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट (Corona crises) अद्यापही वाढतच चालले आहे . मागील २४ तासांमध्ये ८६ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची (Corona patient) एकूण संख्या ५४ लाख ८७ हजारांच्या पुढे पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५४ लाख ८७ हजार ५८१ कोरोनाबाधितांमध्ये १० लाख ३ हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४३ लाख ९६ हजार ३९९ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८७ हजार ८८२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER