देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्या ९ लाखांच्या वर

india-covid-19

नवी दिल्ली :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता ९ लाखांच्या वर गेली आहे. मागील २४ तासांत २८ हजार ४९८ नवे रुग्ण आढळले असून, ५५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

देशात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ११ हजार ५६५ असून, आतापर्यंत ५ लाख ७१ हजार ४६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत देशभरात २३ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल (13 जुलै) दिवसभरात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा 2 लाख 60 हजार 924वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 5 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, राज्यात काल 193 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा 10 हजार 482वर पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER