देशातील सहकारी बँका अडचणीत

मुंबई :- देशात गेल्या 16 वर्षात 387 बँका बंद पडल्या (Banks closed). मार्च 2004 मध्ये 1926 बँका होत्या. त्यांची संख्या आज 1539 झाली आहे. 2004 ते 2012 या आठ वर्षांतच त्यांच्यापैकी 308 बँका बंद झाल्या. यापैकी 136 बँकांचे अन्य मोठ्या बँकेत विलीनीकरण झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 73, गुजरातमधील 35, आंध- प्रदेशातील 12, तर कर्नाटकातील चार बँकांचा समावेश आहे. ही सर्व आकडेवारी रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या पंधरवड्यात प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट ऑन ट्रेड अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया 2019-20 यामध्ये सविस्तरपणे दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने शंभर कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या 892 सहकारी बँकांचा टायर वनमध्ये, तर अन्य सर्व 647 नागरी सहकारी बँकांचा समावेश टायर टू मध्ये केला आहे. टायर वनमधील बँकांमध्ये एकूण 38 हजार 487 कोटी रुपयांच्या ठेवी (7.7 टक्के) आहेत; तर टायर टू मधील बँकांत 4,62,722 कोटी रुपयांच्या (92.3 टक्के) ठेवी आहेत.

देशातील 52 सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. बँकेवरील नियंत्रण कायद्यात नुकत्याच सुधारणा झाल्या. त्यानंतर राज्यातील तीन बँकांचा परवाना गेल्या दोन महिन्यांत रद्द करण्यात आला. मराठे याबाबत म्हणाले, रिझर्व्ह बँक कारवाई करतानाही मुख्यत्वे ठेवीदारांचे कमीत कमी नुकसान होईल, याकडे त्यांचे लक्ष असते. आर्थिक अडचणीत असलेल्या बँकांना रिझर्व्ह बँक पहिल्यांदा अर्थसुधारणा करण्यास सांगते. ज्या बँका ते करू शकणार नाहीत, त्या अवसायनात जातील. अडचणीत आलेल्या ज्या नागरी बँकांची पडझड होणार आहे, ती येत्या दोन-तीन वर्षांत सुरू होईल शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER