चिनी सैन्यांकडून कराराचं सतत उल्लंघन; हवेत गोळीबार, भारतीय चौक्यांजवळ येण्याचा प्रयत्न

India-China border dispute

नवी दिल्ली : चिनी (China) सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसेच ते भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते, अशी माहिती भारतीय लष्कराकडून (Indian Army) देण्यात आली आहे. त्या उलट “भारत नियंत्रण रेषेवर शांतता राहावी यासाठी कटिबद्ध असताना चीन सतत चिथावणीखोर गोष्टी करत आहे.

भारताने कधीही नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला नाही तसेच गोळीबारसारख्या आक्रमक गोष्टी केल्या नसल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. “लष्करी तसंच राजकीय स्तरावर चर्चा सुरू असताना पीपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचं उल्लंघन करत असून आक्रमक गोष्टींचा अवलंब करत आहे. ७ सप्टेंबरला चिनी सैन्यांनी नियंत्रण रेषेवर आपल्या फॉरवर्ड पोस्टच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यात आलं असता चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार करत आपल्या सैन्याला चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आपल्या सैन्याने संयम तसेच जबाबदारीने परिस्थिती हाताळली.” अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

भारत – चीन सीमेवरील 10 महत्त्वाच्या घडामोडी –

 • 1) शी जिनपिंग यांचा पाकीस्तान दौरा रद्द चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. या वर्षाच्या अखेरीस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तान दौर्‍यावर येणार होते. शी यांच्या भेटीच्या निमित्ताने इम्रान खान सरकार त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करत होते. ‘सौदी एटीएम’ बंद झाल्यावर ते चिनी राष्ट्राध्यक्षांना खुश करण्यास आणि अधिक आर्थिक मदत मिळवतील अशी आशा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. आता चिनी राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानमधील चिनी राजदूत याओ जिंग यांनी सांगितले की कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
 • 2) भारतीय लष्कराचा एलएसी लडाखमध्ये संघर्ष वाढला –
 • पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे. चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
 • 3) ऑस्ट्रेलियन पत्रकारांना धमकावणा पत्रकारांना बीजिंगमधून बाहेर काढण्यात आले.
 • 4) चीनने नुकतेच एक गुप्त स्पेस प्लेन लँड केले त्याने ऑर्बिटमध्ये काहीतरी सोडले असावे अशी शंका –
 • 5) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-चीन अर्थव्यवस्थेला गळ घालण्याचा धोका दर्शविला.
 • 6) अमेरिकेने व्यापार बंदी लागू करण्याच्या घोषणेनंतर चीनी एसएमआयसीचा स्टॉक बुडाला.
 • 7) चीनमधील एकमेव टीव्ही कारखाना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स नोव्हेंबरपर्यंत बंद करेल.
 • 8) पांगोंग त्सोच्या दक्षिणेकडील काठावर भारतीय सैन्याने ब्लॅक टॉप हाइट्स हस्तगत केली.
 • 9) भारताने पबजीवर बंदी घातली असून, 110 इतर चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर परिणाम. या एप्सबंदीमुळे संबंधीत कंपनीला एका दिवसात 14 अब्ज डॉलर्स गमावावे लागले. .
 • 10) तर, कालच्या पूर्व लडाखमधील चीनच्या कुरापतीनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणत्याही भडकवणा-या कारवाईविरूद्ध भारताने चीनला इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER