भारताचा अवघ्या ११ धावांनी अफगाणिस्तानवर विजय; अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज

India beat Afghanistan by 11 runs

क्रिकेट विश्वचषक 2019 साऊदॅम्प्टन : आयसीसी वर्ल्ड कप-२०१९ भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामान्य दरम्यान आज भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत आणि अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना चांगलाच रंगला होता. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अखेरचाय चेंडूपर्यंत किल्ला लढवला खरा, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. अवघ्या ११ धावांनी भारताने हा सामना जिंकला. भारताने अफगाणिस्तानपुढे २२५ धावांचे छोटे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग अफगाणिस्तानला करता आला नाही.

हि बातमी पण वाचा : विश्वचषकातील १० वी हॅटट्रीक भारताच्या मोहम्मद शमीची!

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवून अफगाणिस्तानने टीम इंडियाला कोंडीत पकडले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करून संघाला या गुंत्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. विजय शंकरला आज मोठी खेळी करून आपले स्थान पक्कं करण्याची संधी होती, परंतु तोही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. त्यामुळे भारताला २२४ धावांपर्यंतच मजल मारता आली.

महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवची अर्धशतकी भागीदारी

कोहली बाद झाल्यानंतर धोनी आणि जाधव यांनी बराच काळ खेळपट्टीवर नांगर रोवला होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांच्या धावांची गती अत्यंत संथ होती. धोनीने ५२ चेंडूंत २८ धावा केल्या आणि त्यात केवळ तीन चौकरांचा समावेश होता. आदिल रशीदनं त्याला यष्टिचीत केले. भारताचा डाव २२४ वर संपुष्टात आला.

प्रतित्युत्तरात आलेल्या अफगाण संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली मात्र त्यांना विजय मिळविण्यात यश आले नाही. नवख्या खेळाडूंचा डाव २१३ धावत गुंडाळला.