भारताचा ‘फार्म’ बिघडला, ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न मावळले

India and New Zealand's Twenty20 matches the dream of winning the historic series was lost

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत भारत माघारीवर राहिला. न्यूझीलंडला त्यांच्यात भूमीत ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करायचे आणि मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अखेर अपूर्ण राहिले. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु यजमान न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. भारताला 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.

ही बातमी पण वाचा : दिल्लीतील क्रिकेट निवडकर्त्यावर प्राणघातक हल्ला

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करीत न्यूझीलंडमध्येही इतिहास रचण्याचा भारताचा विचार होता. मात्र गत दोन सामन्यात गोलंदाजांचा ढिसाळ फार्म न्यूझीलंडच्या पराभवास कारणीभूत ठरला.

प्रथम फलंदाजी करीत किवींनी 20 षटकात 4 बाद 212 धावा चोपल्या आणि भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन अगदी स्वस्तात निपटला. पहिल्याच षटकात मिचेल सँटनरने त्याला ( 5) धावावर बाद केले. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व विजय शंकर यांनी संघावर दडपण येऊ दिले नाही. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची उत्तम भागीदारी केली. विजय 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावांवर बाद झाला.

त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकेबाजी करताना भारताचा डाव थोडाफार सावरला. पंतने 12 चेंडूंत 3 षटकार व 1 चौकार खेचताना 28 धावा केल्या. 13 व्या षटकात पंतला ब्लेर टिकनरने बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली, परंतु दुसऱ्या बाजूने रोहित संयमी खेळी करत होता. पण, रोहित, हार्दिक आणि महेंद्रसिंग धोनी हे झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या. कार्तिक खेळपट्टीवर असल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत होत्या. कृणालनेही त्याला तोडीसतोड साथ दिली. पण त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रो (72) आणि टीम सेइफर्ट (43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम अगदी सोपे केले. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकात धडाकेबाज फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूत 30 धावा केल्या.

उत्तम फार्मात असलेल्या भारतीय संघाने कसोटी मालिका 4-1 अशा फरकाने खिसात घातल्यानंतर तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताचा फार्म अचानक बिघडला. कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेवर भारताचा ताबा राहील अशा आशा संपर्णू भारत वासियांच्या होत्या मात्र त्यावर आता पूर्ण विराम लागले.