इंग्लंडमध्ये होणार भारत व भारत ‘अ’ सराव सामना

भारतीय क्रिकेटच्या (Indian cricket) इतिहासात आजवर जे घडले नव्हते ते यंदा जुलैमध्ये घडणार आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात (England tour) भारत आणि भारत ‘अ’ (India and India ‘A’) संघादरम्यान सामना होणार आहे. भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी यंदा जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्या मालिकेच्या आरंभी हा चार दिवसांचा सराव सामना होणार आहे. नाॕर्दम्पटनशायरच्या काउंटी मैदानावर हा सामना खेळला जाईल.

विराट कोहलीचा सिनिअर संघ आणि भारत ‘अ’ संघ असे दोन्ही संघ एकाच काळात इंग्लंडचा दौरा करणार आहेत. भारतीय संघाचा पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नाॕटींघम येथे होईल. त्याच्याआधी या सराव सामन्याचे नियोजन आहे; पण निश्चित तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. दुसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट, तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट, चौथा २ ते ६ सप्टेंबर आणि पाचवा व शेवटचा सामना १० ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER