भारतीय सैन्याने चीनचा डाव उधळला, पैंगोग त्सो झील इथे दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने

India - China

लडाख : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झाली आहे. चीनी सैन्य (Chinese Army) त्यांच्या कुरापती कमी करण्यास तयार नाही, त्याला भारतीय सैन्यानेही (Indian Army) चोख उत्तर दिले आहे. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. २९ ऑगस्टला रात्री उशिरा पैंगोग त्सो झील इथे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

चीननं पुन्हा एकदा भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी चीन सैनिकांचा हा डाव उधळून लावल्याची माहिती पुढे आली आहे. गलवान खोऱ्यानंतर चीननं आपलं सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केलं होतं. चीनच्या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्यानं ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

एलएसीमधील तणावपूर्ण वातावरण पाहता भारतीय सैन्याची विकास रेजिमेंट बटालियन उत्तराखंड येथून पँगौंग तलावाच्या दक्षिणेकडच्या भागात तैनात करण्यात आली होती. या बटालियनने वास्तविक नियंत्रण रेषेवरील ज्याठिकाणी भारतीय क्षेत्राकडे दुर्लक्ष केले होते, तेथील एका उंच पठाराच्या जागेवर कब्जा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER