भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची १ दिवसीय मालिकाही जिंकली

ms-dhoni-kedar-jadhav

मेलबोर्न :- मेलबोर्नच्या तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला आणि एक दिवसीय मालिका २- १ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्यांदा भारताने एक दिवसीय क्रिकेट मालिका जिंकली आहे.

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २३० धाव केल्या. सुरुवातीलाच भुवनेश्वर कुमारने स्वस्तात दोन गडी बाद केले. नंतर शामी आणि चहलने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. युझवेंद्र चहलने सर्वाधिक ६ बळी घेतले. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी २ – २ बळी घेत चांगली साथ दिली.

भारताचीही सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा फक्त ९ धावा काढून बाद झाला. संघाची धावसंख्या ५९ असताना शिखर (२३ धावा) बाद झाला.

नंतर धोनी आणि विराटने जबाबदारीने भारताला शंभरीपार नेले. विराट ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनी आणि केदार जाधवने संयमित खेळत भारताला विजय मिळवून दिला. धोनीने ८७ आणि केदार जाधवने ६१ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

उल्लेखनीय म्हणजे भारताने कसोटी पाठोपाठ एक दिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली. या दोन्ही प्रकारातील मालिका पहिल्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्यांदा जिंकल्या आहेत.