भारतालाही एका बायडनची गरज – दिग्विजय सिंह

Digvijay Singh

दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला. यावरून भारतातही अशा बदलाची गरज व्यक्त करताना काँग्रेसचे (Congress) नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी ट्विट केले आहे – आता भारतालाही एका बायडनची गरज आहे. आशा करूया की आपल्याला २०२४ मध्ये असा नेता मिळेल.

अमेरिकेच्या नागरिकांचे अभिनंदन करताना दिग्विजय सिंह म्हणालेत – सर्व अमेरिकन मतदारांचे बायडन यांची निवड केल्याबद्दल अभिनंदन. बायडन अमेरिकन लोकांना एकजूट करतील आणि आधीच्या अध्यक्षांप्रमाणे फूट पाडणार नाहीत.

दुसऱ्या ट्विटमध्ये भाजपाला टोमणा मारताना ते म्हणालेत – आता भारतालाही एका बायडनची गरज आहे. आशा करूया की आपल्याला २०२४ मध्ये असा नेता मिळेल. राजकीय पक्षांशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयाने यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतातही फूट पाडणाऱ्या शक्तींना हरवावे लागेल. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER