अपक्ष आमदार गीता जैन आज शिवसेनेत, मातोश्रीवर उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन

Geeta Jain-CM Thackeray

हे राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे भाजपला धक्का बसला. आपल्यासोबत आणखीही काही नेते असल्याचं खडसे यांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादीनंतर आता मुंबईतल्या अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या हातात शिवबंधन बांधणार आहेत. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे  (Shivsena)संख्याबळ वाढणार आहे.

जैन या महापौर असताना कामकाज व वादग्रस्त मुद्द्यांवरून माजी आमदार नरेंद्र मेहतांशी (Narendra Mehta) त्यांचे बिनसले. त्यानंतर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मेहता यांच्याच पारड्यात गेल्या वर्षी उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे (BJP) उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. राज्यात भाजपने सरकार बनवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आणि जैन यांना पुन्हा पक्षासोबत येण्याचा आग्रह धरला.

दुसरीकडे शिवसेनेकडून त्यांना आमदार झाल्यापासूनच सेनेत प्रवेशासह राज्यमंत्रीपद देण्याची ऑफर आली होती. परंतु, त्या वेळी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मीरा-भाईंदर भाजपची जबाबदारी देण्याचा आग्रह त्यांनी केला होता. परंतु, प्रत्यक्षात जैन यांना डावलल्याने त्या नाराज होत्या.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे जैन यांच्या सेनाप्रवेशासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही जैन यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर, जैन यांनी उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

आता बदलती समिकरण लक्षात घेऊन त्यांनी थेट शिवसेनेतच जाण्याचा निर्णय घेतला आहे. या फायदा शिवसेनेला होणार आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. त्या जैन समाजाच्या आमदार असल्याने राज्यातील जैन समाजाच्या मोठया संख्येने असलेल्या मतदारांमध्येही शिवसेनेबाबत चांगला संदेश जाईल, असे सेनेतील एका नेत्याने सांगितले.

ही बातमी पण वाचा : लस फक्त बिहारलाच, मग इतर राज्ये पाकिस्तानात आहेत का? – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER