अपक्ष आमदार गीता जैन उद्धव ठाकरे यांच्याकडून उद्या बांधणार शिवबंधन

Geeta Jain - Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईतल्या (Mumbai) अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (२४ ऑक्टोबर) रोजी मातोश्रीवर त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जैन यांना शिवबंधन बांधणार आहेत.

जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गीता भाजपात होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. भाजपाचे नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. गीता यांनी मीरा-भाईंदरसाठी उमेदवारी मागितली होती.

निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेचा घोळ सुरू असताना त्यांनी त्यावेळचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. नंतर सत्तेचं गणित बदलले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार आले.

आता सत्तेचे बदललेले समीकरण लक्षात घेऊन त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदत केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER