जिलेबी आणि मिठाईवर स्वातंत्र्यदिनी निर्बंध

Sweets

कोल्हापूर : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरूपात मिठाई, जिलेबी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येवून नये, याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी आदेश दिले आहेत.

स्वातंत्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात मिठाई, जिलेबी वाटप व विक्री करणाऱ्या आस्थापनांसाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सुचना दिल्या. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक स्वरुपात मिळाई, जिलेबी वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत व गर्दी करु नका.

आस्थापना चालक, कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे, ॲप्रन व मास्क वापरणे असेत योग्य ते सामाजिक अंतर राखणे बंधनकार असेल. आस्थापनेतील सर्व कार्यखेत निर्जंतुकीकरण करणे बंधनकारत असेल, तसेच सर्व सामाईक वापर क्षेत्रे व पृष्ठभाग प्रत्येकी दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे बंधनकार असले.

दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्यते सामाजिक अंतर राखण्यासाठी मार्किंग करणे बंधनकारक असेल, तसेच एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक आस्थापनेत एकत्र येणार नाही यांची काटेकोरपणे दक्षता घेणे बंधनकारक आहे.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) यांच्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER