लालकिल्ल्यावर ध्वजारोहण; भारत जरूर आत्मनिर्भर होईल – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशाचा आज ७४ वा स्वातंत्र्यदिन (Independence day) आहे. लालकिल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असून ते देशाला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच, भारत जरूर आत्मनिर्बर होईल, असा विश्वास व्यक्त केला. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे –

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
  • १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला.
  • पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.
  • आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे.
  • कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषिमालाचा पुरवठा करु शकतो. एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे.
  • दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संबोधित मिशन गगयान तसेच गेल्यावर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयासाठी सीडीएस पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या पदाची आता निर्मिती सुद्धा झाली आहे.
  • देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार? कुठली घोषणा करणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या  कार्यक्रमांची घोषणा केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER