‘फायझर’ला कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतात उत्पन्नासाठी पाहीजे आहे कुठली सवलत … वाचा

Maharashtra Today

नवी दिल्ली : लसीमुळे कुणा रुग्णावर दुष्परिणाम झाला तर त्या प्रकरणी रुग्णाला नुकसानभरपाईसाठी खटला दाखल करता येणार नाही, अशी सवलत मिळावी अशी मागणी अमेरिकेच्या ‘फायझर’ (Pfizer) कमनीने केल्याने या कंपनीला भारतात कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करण्यास परवानगी मिळण्यात उशीर होतो आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ज्या देशांमध्ये फायझरची लस वापरली जात आहे त्या देशांनी फायझरला अशी मुभा दिली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की फायझरला अशी सूट दिली तर कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या देशातील कंपन्याही अशी मागणी करतील.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, लसीमुळे रुग्णावर विपरीत परिणाम झाले तर कंपनीविरुद्ध नुकसानभरपाई मागण्याच्या कायद्यातून जगातील अनेक देश कंपनीना संरक्षण देतात. भारताने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( Serum Institute of India ) आणि भारत बायोटेक ( Bharat Biotech ) या दोन देशी कमान्यांना कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी तातडीने परवाना दिला पण, त्यांनाही नुकसानभरपाईतून सूट दिलेली नाही.
(Source: ET)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button