IND VS ENG: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये होईल घमासान, आजपासून तिकिटांचे बुकिंग, PRICE जाणून घ्या

At the world largest cricket stadium in Motera-Ahmedabad

तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर (At the world’s largest cricket stadium in Motera, Ahmedabad)खेळला जाईल. या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजपासून तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या मोटेरा येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या तिसर्‍या कसोटी सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

तिसर्‍या कसोटीत ५० टक्के दर्शकांना परवानगी

जीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले कि चार सामन्यांच्या मालिकेच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्टेडियमवर इंग्लंडचा संघ भारत विरुद्ध दोन कसोटी सामने (ज्यामध्ये डे-नाईट सामना समाविष्ट आहे) आणि पाच टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

तिकिटांची किंमत

गुलाबी बॉल टेस्ट (मालिकेचा तिसरा सामना) २४ फेब्रुवारीपासून सुरू होईल, ज्यासाठी तिकिटांची किंमत ३०० ते १००० रुपयांदरम्यान आहे.

उद्घाटन सोहळ्याला येऊ शकतात अमित शहा

जीसीएचे उपाध्यक्ष धनराज नथवाणी म्हणाले की, कोविड -१९ नंतर मालिका होस्ट करणे जीसीएसाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि क्रीडा प्रेमींच्या करमणुकीसाठी सर्व सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जातील.

जीसीएच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ फेब्रुवारी रोजी स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER