Ind vs Eng: आर अश्विनपासून ते विराट कोहलीने चेन्नई मध्ये लूटली वाहवाही, कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीचे हे आहेत ५ मोठे क्षण

Virat Kohli-R Ashwin

फलंदाजी करण्यासाठी कठीण मानल्या जाणार्‍या चेपाकच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) आठव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकला आणि नंतर अक्षर पटेलसह इंग्लंडची अव्वल क्रमवारी पसरविली. तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी एक शानदार दिवस होता, अश्विनपासून ते विराट कोहली (Virat Kohli)ने चेन्नई मध्ये वाहवाही लूटली.

१. टर्निंग खेळपट्टीवर अश्विनचे स्फोटक शतक

चेन्नई येथे सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी रविचंद्रन अश्विनने टीम इंडियासाठी १०६ धावांचा स्फोटक डाव साकारला आणि अनेक मोठे विक्रम केले. चेन्नईच्या खेळपट्टीवर टीम इंडियाचे फलंदाज दुसर्‍या डावात धावा करण्यासाठी धडपडत होते, रविचंद्रन अश्विनने उत्तम फलंदाजी करून चाहत्यांची वाहवाही लूटली. रविचंद्रन अश्विनने ४ वर्षानंतर कसोटीत शतक ठोकले. चेन्नई कसोटीत अश्विनने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले. यासह अश्विनने तिसर्‍या वेळेस एकाच कसोटी सामन्यात ५ बळी आणि शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अश्विन हा एकाच कसोटी सामन्यात ५ विकेट आणि शतक ठोकणारा जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू इयान बोथम या यादीत प्रथम स्थानावर आहे. इयान बोथमने ५ वेळा हे पराक्रम केले आहेत.

२. विराट कोहलीचा ६२ धावांचा कर्णधारी डाव
इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन करत ६२ धावांची कर्णधारी खेळी केली आणि रविचंद्रन अश्विन समवेत भारताला ४०० धावांची आघाडी मिळवून दिली. विराट कोहलीने अश्विनबरोबर सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. कोहलीने स्थिर फलंदाजी केली परंतु यादरम्यान काही स्फोटक ड्राईव्ह मारले आणि त्याने २५ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. मोईनने कोहलीचा शानदार डाव संपवला.

३. चेतेश्वर पुजाराचा विचित्र धावबाद

इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथे सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा विचित्र आणि खराब मार्गाने धावबाद झाला. पुजाराला धावबाद करण्याची पद्धत अत्यंत बेकायदेशीर होती, त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वास्तविक असे झाले की १९ व्या षटकात इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अली गोलंदाजीसाठी आला. या षटकात मोईन अलीच्या शेवटच्या बॉलवर चेतेश्वर पुजारा धाव चोरण्यासाठी क्रीजच्या पुढे गेला, पण शॉर्ट लेगवर उभा असलेल्या ओली पोपने यष्टिरक्षक बेन फॉक्सकडे थ्रो फेकला. पुजारा पायर्‍यांचा वापर करून क्रीझपेक्षा खूप पुढे गेला होता. पुजारा क्रीजवर परतण्याचा प्रयत्न केला पण त्याची बॅट क्रीजमध्ये अडकली आणि तो बाहेर राहिला. यानंतर बेन फॉक्सने त्याला धावबाद केले.

४. बेन स्टोक्सचा सर्वोत्कृष्ट स्टंट

कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताच्या दुसर्‍या डावादरम्यान बेन स्टोक्सने आपल्या स्टंटने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. क्षेत्ररक्षण दरम्यान बेन स्टोक्सने दोन्ही पाय उंचावले आणि आपल्या हातावर चालू लागला. बेन स्टोक्सचा हा स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स मैदानात एनर्जेटिक राहतो. मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी.

५. अश्विन आणि अक्षर पटेल यांनी इंग्लंडची टॉप ऑर्डर पळवली

चेपाकच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विनने अक्षर पटेलसह इंग्लंडची अव्वल क्रम विखुरला. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलने सामन्यावरची पकड आणखी घट्ट केली आणि तिसर्‍या दिवशी स्टम्पपर्यंत इंग्लंडला दुसर्‍या डावात तीन विकेट्सवर ५३ धावांवर रोखले आणि आता सामना जिंकण्यासाठी सात विकेट्स लागतील. भारताचा दुसरा डाव २८६ धावांत आटोपला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER