IND VS ENG: इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का, दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला जोफ्रा आर्चर

Jofra Archer
File Photo

भारताविरुद्धच्या (India) दुसर्‍या कसोटीपूर्वी इंग्लंड (England) संघाला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.

पहिल्या कसोटीत टीम इंडियाला २२७ धावांनी नमविणाऱ्या इंग्लंड संघाला दुसर्‍या कसोटीपूर्वी धक्का बसला. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.

दुसर्‍या कसोटीमधून बाहेर जोफ्रा आर्चर
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की कोपर दुखापतीमुळे आर्चर भारताविरुद्धची दुसरा कसोटी सामना खेळणार नाही.

वास्तविक, कोपराच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चरला आता इंजेक्शन घ्यावं लागलं आहे, ज्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-० ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत आर्चरच्या अनुपस्थितीमुळे इंग्लिश संघाला दुसर्‍या कसोटीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्यांनी भारताला २२७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. आर्चर संघाबाहेर गेल्यानंतर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला त्याचे स्थान मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER