IND vs ENG : बेन स्टोक्सने केली फसवणूक! थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पोलखोल, Video Viral

Ben Stokes

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचा झेल सोडल्यानंतरही बेन स्टोक्सने पंचांना अपील केले. थर्ड पंचांच्या निर्णयामुळे गिल बाद नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सोशल मीडियावर चाहते स्टोक्सवर बेइमानीचा आरोप करीत आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने पाहुण्या संघाला पूर्णपणे पराभूत केले. जो रुटचा संघ त्यांच्या कसोटी इतिहासातील चौथ्या सर्वांत कमी धावसंख्येवर बाद झाला. ११२ धावा काढून बाद झाल्यावर इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आणि मैदानावर इंग्लिश खेळाडूंनी आत्मसमर्पण केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याच वेळी सामन्यात काही तरी घडले, हे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले.

बेन स्टोक्सने केली बेइमानी?

इंग्लंडला अवघ्या ११२ धावांत बाद करून टीम इंडियाने फलंदाजीस सुरुवात केली. भारतीय संघाचा डाव नुकताच सुरूहोताच इंग्लंडचा संघ रागात दिसला. डावाच्या दुसर्‍या षटकात इंग्लंड संघाकडून असे काही तरी घडले जे सर्व प्रेक्षक फक्त पाहातच राहिले.

भारताच्या डावाच्या दुसर्‍या षटकात शुभमन गिलच्या बॅटला लागून चेंडू बेन स्टोक्सजवळ गेला, जो दुसर्‍या स्लिपवर फिल्डिंग करत होता. स्टोक्सने बॉल पकडला आणि त्यानंतर संपूर्ण टीमने अपील केले. त्यानंतर पंचने सॉफ्ट डिसीजन बाद दिला आणि तिसऱ्या पंचांने तपास केला.

जेव्हा तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ पाहिला तेव्हा उघडकीस आले की चेंडू जमिनीवर लागला होता. त्यानंतर स्टोक्सने चेंडू पकडला. थर्ड अंपायरने नाबादचा निर्णय दिला. त्यानंतर जो रुट आणि इंग्लंड संघ खूप निराश झाला.

स्टोक्सवर भडकले चाहते
बॉलने प्रथम मैदानाला स्पर्श केला आणि त्यानंतर बेन स्टोक्सने झेल घेतला. अशा परिस्थितीत चाहते या प्रकरणावर भडकले. त्यांचा असा विश्वास आहे की, ही बेइमानीपेक्षा काही कमी नाही. इतकेच नाही तर चाहत्यांनी स्टोक्सला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER