IND vs AUS : झहीर म्हणाला- ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये गोलंदाजांची भूमिका निर्णायक

Zahheer Khan

माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा (Zaheer Khan) असा विश्वास आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना गोलंदाजांच्या कामगिरीने निश्चित होईल. दोन्ही संघांत जगातील काही उत्कृष्ट गोलंदाजांचा समावेश आहे.

जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे भारतीय संघात आहेत तर मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघात आहेत.

भारतीय क्रिकेट संघ या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तेथे तीन एकदिवसीय, तीन टी -२० आणि चार कसोटी सामने खेळणार आहेत. २७ नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेसह या दौर्‍याची सुरुवात होईल. झहीर २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा एक भाग होता.  तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांमध्ये नेहमीच चांगली बाउन्स आणि वेग असतो. त्यामुळे मला वाटते की गोलंदाज हे एकदिवसीय, टी -२० आणि कसोटी मालिकेत निर्णायक ठरतील.

तो म्हणाला, “जेव्हा कोणी जगातील सर्वोच्च स्तरावरील गोलंदाजांविषयी बोलतो तेव्हा जे नाव येतात, या मालिकेसाठी ते सर्व खेळपट्टीवर येतील.” झहीरने असेही म्हटले की, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरची उपस्थितीत ऑस्ट्रेलियाकडून भारताला कठोर आव्हानाला सामोरे जावे लागेल.

भारताने मागच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीवर २-१ ने हरवले होते. तेव्हा वॉर्नर आणि स्मिथ संघात उपस्थित नव्हते; कारण बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोन्ही खेळाडूंना वर्षाकाठी बंदी घालण्यात आली होती.

या मालिकेचे अधिकृत प्रसारक सोनी पिक्चर्स स्पोर्ट्स नेटवर्कवर माजी भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “आता स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात परतले आहेत, मागील ऑस्ट्रेलिया दौर्‍यापेक्षा भारतीयांना निश्चितच खूपच कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER