IND vs AUS : जसप्रीत बुमराहच्या पहिल्या अर्धशतकानंतर विराट कोहलीने अशी दिली प्रतिक्रिया, पहा व्हायरल व्हिडिओ

Jasprit Bumrah Video

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसर्‍या सराव सामन्यात पहिले अर्धशतक झळकावले. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) आनंदाने उडी घेतली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी सिडनीच्या मैदानावर सराव सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सराव सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने चमत्कार केले. पण यावेळी गोलंदाजीत नव्हे तर फलंदाजीत. होय, बुमराहने ऑस्ट्रेलिया च्या गोलंदाजांना खूप फटके मारले.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १९४ धावा केल्या. जर बुमराहची फलंदाजी चालली नसती तर भारतीय संघ आपले १५० धावा पूर्ण करू शकला नास्ता. सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याने षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावांची खेळी केली. बुमराहच्या कारकीर्दीतील हा पहिला फस्ट क्लास अर्धशतक आहे.

विराट कोहली हा या सामन्याचा भाग नव्हता पण तो हे पहात होता. जशी बुमराहने बॅट वर केली तर स्टँडमध्ये बसलेल्या विराट कोहलीने आनंदाने उडी घेतली. बाकीच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये टाळ्या वाजवल्या. विराटची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना ते खूप आवडत आहे.

बुमराह व्यतिरिक्त शुभमन गिलने ५८ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. तसेच युवा सलामीवीर पृथ्वी शॉने ४० आणि मोहम्मद सिराजने २२ धावांचे योगदान दिले.

बुमराहने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत १४ कसोटी, ६७ एकदिवसीय आणि ५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ६८, एकदिवसीय सामन्यात १०८ आणि टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५९ विकेट आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER