IND vs AUS: विराट कोहली वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याच्या उंबरठ्यावर, रिकी पाँटिंगला ठेवू शकतो मागे

Virat Kohli & Ricky Ponting

एडिलेडमध्ये विराट कोहलीकडे (Virat Kohli) रिकी पोटिंगला (Ricky Ponting) मागे ठेवण्याची चांगली संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक झळकल्यानंतर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतो.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला कसोटी सामना खेळेल. एडिलेड टेस्टनंतर विराट पितृत्वाच्या रजेवर मायदेशी परतणार आहे. अशा परिस्थितीत पहिला सामना जिंकणे भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कांगारूंचा पगडा भारी आहे, त्यामुळे विराटला मोठा डाव खेळावा लागेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटचा विक्रम चांगला राहिला आहे आणि जेव्हा विराट मैदानावर येतो तेव्हा काही रेकॉर्ड तोडला जातो. यावेळीदेखील विराट कोहलीकडे सुवर्णसंधी आहे. या सामन्यात तो विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

रिनके पॉन्टिंगला मागे टाकू शकतो कोहली

विराट कोहलीने आतापर्यंत कर्णधार म्हणून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत (कसोटी + एकदिवसीय + टी -20 आंतरराष्ट्रीय) ४१ शतके झळकावली आहेत आणि तो ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज रिकी पॉन्टिंगच्या बरोबरीत आहे. एडिलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये जर विराट कोहली शतक झळकविण्यात यशःवी झाला तर कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके ठोकण्याचा विश्वविक्रम तो आपल्या नावावर करून घेईल आणि रिकी पॉन्टिंगला मागे ठेवेल.

कोहलीने १८७ सामन्यांच्या २१६ डावात ४१ शतके ठोकली आहेत. तर रिकी पाँटिंगने ३२४ सामन्यांच्या ३७६ डावात ४१ शतके ठोकली आहेत.

एडिलेड मैदान विराटसाठी आहे भाग्यवान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना एडिलेडमध्ये खेळला जाईल, जो दिवस-रात्र असेल. एडिलेड मैदानावरील विराट कोहलीचा विक्रम शानदार आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांच्या ६ डावांमध्ये ३ शतके ठोकली आहेत.

विराट कोहलीने शेवटचा सामना एडिलेडमध्ये २०१९ मध्ये खेळला होता. त्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १०४ धावा करत शतक झळकावले होते. अशा परिस्थितीत या वेळीही त्याच्याकडून मोठा डाव अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER