IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करेल, ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित!

मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेचे (Ajinkya Rahane) शतक हे गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. या मैदानावर टीम इंडिया आपला चौथा सामना जिंकू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) यजमान संघाला बॅकफूटवर ठेवले आहे. कार्यकारी कर्णधार अजिंक्य रहाणेने दुसर्‍या दिवशी नाबाद १०४ धावांची खेळी केली, ज्यावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून सामना काढून घेऊ शकेल. या मैदानावर भारताने ज्याही सामन्यात विजय मिळविला आहे, त्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या सामन्यात भारतीय संघाचा विजय निश्चित झाला आहे.

टीम इंडियाने आतापर्यंत १४ कसोटी सामना मेलबर्न मैदानावर खेळला आहे. ज्यामध्ये ती अवघ्या तीन सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. या सर्वांमध्ये एक विशेष बाब आहे, भारतीय फलंदाजांनी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शतके ठोकली होती. १९९७ मध्ये जेव्हा मेलबर्न येथे भारताने पहिली कसोटी जिंकली तेव्हा कर्णधार सुनील गावस्करने ११८ धावांचे शतकीय डाव खेळला होता.

१९८० मध्ये दुसऱ्यांदा टीम इंडियाने या मैदानावर सामना आपल्या नावावर केला होता, त्या सामन्यात गुंडप्पा विश्वनाथने ११४ धावा केल्या होत्या. या व्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने २०१८-१९ च्या दौर्‍यावर मेलबर्न येथे टीम इंडियाने जिंकलेल्या सामन्यादरम्यान १०६ धावांचा शतकीय डाव खेळला होता.

विजयाच्या वाटेवर टीम इंडिया

दुसर्‍या दिवशी पाच विकेट्सवर २७७ धावा करुन भारताने ८२ धावांची आघाडी घेतली आहे. ज्यात रहाणे १०४ आणि जडेजा ४० धावांवर फलंदाजी करीत आहेत. दोघांमधील सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी ‘गेम चेंजर’ असल्याचे सिद्ध होऊ शकते.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही वाटते की हे शतक कांगारुंकडून सामना खेचू शकेल. त्याने ट्वीट केले की, ‘अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी अतिशय महत्त्वाची भागीदारी केली आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून हा सामना खेचून घेण्यात येईल. अजिंक्य रहाणेने एक शानदार डाव खेळला, जो त्याच्या बचावामध्ये केवळ मजबूत दिसत नव्हता तर तो आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्नही करीत होता. त्याने चांगली लय ठेवली.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER