IND vs AUS Sydney Test Day 4 LIVE: ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित, भारताला ४०७ धावांचे लक्ष्य

Australia's innings announced, India set 407-run target

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी (IND vs AUS Sydney Test Day 4 ) मालिका सध्या १-१ वर आहे, त्यामुळे सिडनी कसोटीचा चौथा दिवस महत्वाचा आहे. भारताला एक शानदार खेळ दाखवावा लागेल.

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळली जात आहे. यजमान संघाने टीम इंडियाला विजयासाठी ४०७ धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.

ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित

ऑस्ट्रेलियन संघाने आपला दुसरा डाव ३१२/६ वर घोषित केला. अशाप्रकारे यजमानाने ४०६ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी रविवार आणि सोमवारचा दिवस उरला आहे.

स्मिथ आउट

सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथने दुसर्‍या डावात ८१ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने त्याला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला ५ वा धक्का दिला.

वेडे परतला पवेलियन

मॅथ्यू वेड आज पूर्ण फ्लॉप होता. नवदीप सैनीने त्याला विकेटकीपर वृध्दिमान साहाकडून झेलबाद केले. वेडला केवळ ४ धावा करता आल्या.

लाबुशेन आउट

शतका जवळ पोहोचणाऱ्या मारनस लाबुशेनला नवदीप सैनीने धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज ७३ धावा करुन बाद झाला. स्टम्पच्या मागे साहाने शानदार झेल टिपला.

जडेजा शिवाय टीम इंडिया

दुखापतीमुळे रवींद्र जडेजा संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर आला आहे. तसेच ऋषभ पंतची कोपर दुखापत फारशी गंभीर नाही. तो दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी हजर असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER