IND vs AUS Sydney Test Day 2 LIVE: स्टीव्ह स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलिया ३३८ धावांवर झाला बाद

IND vs AUS Sydney Test Day 2 Steve Smith

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका सध्या बरोबरीत १-१ अशी आहे, त्यामुळे सिडनी कसोटीचा दुसरा दिवस खूप महत्वाचा आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळली जात आहे. यजमानांचा पहिला डाव ३३८ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या.

स्मिथचे शतक
सुरू असलेल्या मालिकेच्या पहिल्या ४ डावात अयशस्वी झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथची बॅट चालली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीचे २७ वे शतक झळकावले आणि १३१ धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाने डायरेक्ट हिट मारून त्याला धावबाद केले.

भारतीय गोलंदाजांचा कमाल
सिडनी कसोटीच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपला दम दाखविला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ बळी घेतले. जसप्रीत बुमराह व नवदीप सैनी यांनी २-२ विकेट मिळवले, तर मोहम्मद सिराजला १ विकेट मिळाला. तसेच रविचंद्रन अश्विन विकेट घेण्यास अपयशी ठरला.

लाबुशेनचे शतक चुकले
मार्लनस लाबुशेनने शानदार फलंदाजी केली परंतु त्याचे ५ वे कसोटी शतक केवळ ९ धावांनी हुकले. त्याला रवींद्र जडेजाने अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले.

सिडनीमध्ये पावसामुळे हा खेळ थांबला होता, पण सामना पुन्हा एकदा सुरू झाला. पहिल्या दिवशीही ८ व्या षटकात सामना बराच काळ थांबवावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER