Ind vs Aus: स्टीव्ह स्मिथचे बुमराह-शमीला आव्हान – शॉर्ट बॉलला नाही घाबरत

Steve Smith & Bumhra & Shami

ऑस्ट्रेलियाच्या ‘रन मशीन’ स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय वेगवान गोलंदाजी हल्ल्याला आव्हान दिले आहे. स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी असे म्हटले आहे की त्याने आयुष्यात इतक्या शॉर्ट चेंडूंचा सामना केला आहे आता त्याला भीती वाटत नाही.

स्टीव्ह स्मिथ म्हणाला त्याच्यासमोर शॉर्ट बॉल टाकल्याने ऑस्ट्रेलियालाच फायदा होईल. त्याने न्यूज कोरला सांगितले की, ‘जर संघ मला शॉर्ट बॉल टाकण्याचा विचार करत असतील तर त्याचा फायदा आमच्या संघाला होईल, कारण मी आयुष्यात असे बॉल खेळले आहेत की आता कोणताही तणाव नाही.’

मागील मोसमात न्यूझीलंडविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज नील वेगनेरने शॉर्ट पिच बॉलवर स्मिथला चार वेळा बाद केले. स्मिथ म्हणाला की वेगनेरने शानदार गोलंदाजी केली होती, परंतु इतरांना त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. तो म्हणाला, “इतर काही विरोधी संघांनी प्रयत्न केले, पण वेगनेरने केले तसे करू शकले नाहीत. तो एक आश्चर्यकारक गोलंदाज आहे.’

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर तीन एकदिवसीय, तीन टी -२० आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीचा नेतृत्व जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडून होईल. उमेश यादव आणि नवदीप सैनी हेदेखील कसोटी संघात सहभागी आहेत.

भारतीय संघ २७ नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामने, तीन टी -२० आंतरराष्ट्रीय व चार कसोटी सामने खेळणार आहे. एकदिवसीय आणि टी २० मालिका २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान सिडनी आणि कॅनबेरा येथे खेळली जाईल. यानंतर १७ डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER