IND VS AUS: रवींद्र जडेजाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळने निश्चित

IND VS AUS- Ravindra Jadeja to play in second Test

दुसर्‍या कसोटीत रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. गेल्या वर्षी मेलबर्न टेस्टमध्ये जडेजाने ५ विकेट्स घेतल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात या वेळी चुकण्याची कोणतीही संधी नसल्यामुळे टीम इंडियाला योग्य प्लेइंग इलेव्हनची निवड करावी लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात लाजीरवाणी पराभवानंतर संघाचे मनोबल खूपच कमी असेल आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघावर आणखी दबाव निर्माण होईल. अशा परिस्थितीत जिंकण्यासाठी भारताला यावेळी रणनीती बदलावी लागेल.

पूर्णपणे तंदुरुस्त आहे जडेजा

रवींद्र जडेजा आता पूर्ण तंदुरुस्त आहे. अलीकडेच BCCI ने त्याच्या नेट प्रॅक्टिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचवेळी अष्टपैलू रवींद्र जडेजा प्रथम प्रशिक्षण सत्रासाठी नेटवर पोहोचले आणि फिटनेस टेस्टमध्ये भाग घेतला. जडेजा हातात बॅट घेऊन विकेट्स दरम्यान धावत होता. जाडेजाला नेटस मध्ये जोरदार घाम गाडत आहे, त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा सहभाग होणे हे जवळजवळ निश्चित दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra Jadeja (@ravindra.jadeja)

मेलबर्नमधील जडेजाचा विक्रम

मेलबर्न टेस्टमध्ये जडेजा हा ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध होऊ शकते. मेलबर्नच्या बाउन्सी खेळपट्टीवर जडेजाची फिरकी गोलंदाजी सामन्याची भूमिका बदलू शकते. २०१८-१९ दौर्‍यादरम्यान त्याने कांगारूंना त्रास दिला. गेल्या वर्षी मेलबर्न कसोटीत टीम इंडियाने १३७ धावांनी विजय मिळविला होता. त्या सामन्यात जडेजाने पाच गडी बाद केले होते.

हनुमा विहारी होऊ शकतो बाहेर

टीम इंडियाने दुसर्‍या कसोटीत जडेजाला संधी दिली तर तो संघात कोणाच्या जागी दाखल होईल हा मोठा प्रश्न आहे. अष्टपैलू म्हणून जडेजा भारतीय संघाकडून खेळतो, अशा प्रकारे अष्टपैलू हनुमा विहारीचे बाहेर जाऊ शकतो. एडिलेड टेस्टमध्ये विहारी पूर्ण फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात १६ धावा आणि दुसऱ्या डावात ८ धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER