IND vs AUS: रवींद्र जडेजा टी -२० मालिकेतून बाहेर, “या” गोलंदाजाला संघात केले समावेश

Ravindra Jadeja

पहिल्या टी -२० मध्ये दुखापतीमुळे रवींद्र जडेजा तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेतून बाहेर पडला, शार्दुल ठाकूर संघात सामील झाला

टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाबरोबरच्या तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेमधून बाहेर पडला आहे. कॅनबेरा येथे पहिल्या टी -२० सामन्या दरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली. तो कनकशनमध्ये गेला होता आणि त्याच्या जागी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सबस्टिट्यूच्या म्हणून मैदानात आला होता.

या सामन्यात जडेजा शानदार फलंदाजी करीत होता जेव्हा त्याच्या हेल्मेटवर चेंडू लागला आणि तो वेदनांनी विव्हळत होता. यानंतर त्याने आपली फलंदाजी पूर्ण केली पण आता उर्वरित २ सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे.

आता BCCI ने निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. जाडेजा अद्याप BCCI च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे BCCI ने म्हटले आहे. शनिवारी त्याला काही महत्त्वपूर्ण स्कॅन करावे लागतील.

अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. यानंतर अखिल भारतीय निवड समितीने ठाकूरला टी -२० मालिकेसाठी संघात स्थान दिले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो संघाचा भाग होता आणि तिसऱ्या सामन्यात खेळताना प्रभावी गोलंदाजीही केली.

भारताने सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कांगारुंना १६२ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकांत केवळ १५० धावा करू शकला आणि टीम इंडियाने विजयासह मालिकात पदार्पण केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER