IND vs AUS: टीम इंडियाला मोठा दिलासा, रोहित शर्मा तंदुरुस्त; लवकरच ऑस्ट्रेलियाला होईल रवाना

Rohit Sharma

रोहितने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. आता काही दिवसांत रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने बंगळूरमधील नॅशनल क्रिकेट एकॅडमी (NCA) येथे फिटनेस टेस्ट पास केली. कोरोना विषाणूमुळे ऑस्ट्रेलियामध्ये पृथकवास नियमांमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाही पण शेवटच्या दोन कसोटींमध्ये तो संघाचा भाग होऊ शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, ‘रोहितने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे आणि लवकरच तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.’ रोहित शर्माची फिटनेस टेस्ट NCA चे संचालक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. द्रविडला त्याला फिटनेस प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

येत्या दोन दिवसांत रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशी अपेक्षा आहे. सिडनी (७ जानेवारी – ११ जानेवारी) आणि ब्रिस्बेन (१५ जानेवारी ते १९ जानेवारी) येथे होणाऱ्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो १४ दिवस एकांतवासात राहील.

IPL २०२० मध्ये रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग इजा झाली होती, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी त्याला संघातून वगळण्यात आलं होतं आणि काही दिवसातच तो क्रिकेट खेळण्यासाठी परत आला होता. यानंतर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्यानंतर त्याच्या फिटनेसबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. पण आता टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे की रोहित पूर्ण तंदुरुस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER