IND vs AUS: तंदुरुस्त झाल्यानंतरही रोहित शर्माचा अंतिम दोन कसोटी सामने खेळणे निश्चित नाही! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

Rohit Sharma

रोहित शर्मा आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, असे BCCI ने पुष्टीकरण केले आहे. तथापि शेवटचे दोन कसोटी सामने खेळणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित आहेत.

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त आहे. रोहितने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केल्याची BCCI ने पुष्टी केली असून आता तो ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघास जुडण्यास पूर्णपणे तयार आहे.

पूर्णपणे तंदुरुस्त आहे रोहित शर्मा

BCCI ने एका निवेदनात लिहिले आहे की, “भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्माने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि तो तंदुरुस्त आहे”. निवेदनात म्हटले आहे की, ‘NCA वैद्यकीय संघ रोहितच्या शारीरिक तंदुरुस्तीवर पूर्णपणे समाधानी आहे. वैद्यकीय संघाने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि विकेट्स दरम्यान धावणे यासारख्या निकषांवर त्याची चाचणी केली आहे आणि तो आपल्या स्थानावर समाधानी आहे. त्याला त्याच्या सामर्थ्यावर कार्य करावे लागेल.’

ऑस्ट्रेलियाला लवकरच रवाना होईल रोहित

ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर तो दोन आठवड्यांकरिता क्वारंटीन राहील आणि नंतर संघात सामील होईल. पण कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमधील त्याच्या खेळाविषयी निर्णय संघाच्या वैद्यकीय संघाकडून फेरमूल्यांकनानंतर घेण्यात येईल.

BCCI च्या निवेदनात म्हटले आहे की, “त्याना ऑस्ट्रेलियामध्ये दोन आठवड्यांच्या क्वारंटीनचे सविस्तर वेळापत्रक देण्यात आले असून त्याचे पालन करावे लागेल. हे क्वारंटीन पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघाची वैद्यकीय पथक त्याची तपासणी करेल, त्यानुसार बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत त्यांचा सहभाग निश्चित केला जाईल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER