IND vs AUS : मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला घाबरले इंग्लंडचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड

team india & Chris Silverwood

इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक सिल्व्हरवूड म्हणाले की, भारताला पराभूत करणे खूप अवघड आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना हा पराक्रम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.

भारतीय संघाविरुद्ध चार सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड थोडेसे घाबरलेले दिसत आहेत. ते म्हणाले की, भारताला पराभूत करणे खूप अवघड आहे आणि इंग्लंडच्या खेळाडूंना हा पराक्रम करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मिळालेला विजया कौतुकास्पद

भारतने नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये संपलेली कसोटी मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील भारताचा हा सलग दुसरा मालिका विजय होता. या मालिकेची खास गोष्ट अशी होती की भारताचे जवळजवळ सर्व मोठे खेळाडू दुखापतीमुळे दौर्‍याबाहेर गेले होते, तर संघाचा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे कर्णधार विराट कोहलीही पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता.

सिल्व्हरवूड यांनी भारतीय संघाच्या या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले आहे की, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतून असे दिसून येते की, भारताला पराभूत करणे सोपे होणार नाही. हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे.’

५ फेब्रुवारीपासून सुरू होईल मालिका 

इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नई येथे तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. भारत आणि इंग्लंडचे खेळाडू सध्या सहा दिवसांच्या आयसोलेशनसाठी चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत, जिथे बायो-बबल बनविला गेला आहे. येथे दोन्ही संघांच्या खेळाडूंची नियमित कोरोना विषाणूची चाचणी घेतली जाईल. दोन्ही संघांनी विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर २ फेब्रुवारीपासून सराव करण्यास सक्षम असतील.

चेन्नईमध्ये इंग्लंडवर भारताचे वर्चस्व

चेन्नईमध्ये इंग्लंडवर भारत वर्चस्व गाजवत आहे. दोन्ही संघांनी येथे आतापर्यंत नऊ सामने खेळले असून त्यापैकी भारताने पाच आणि इंग्लंडने तीन सामने जिंकले आहेत. शेवटच्या वेळी जेव्हा इंग्लंड या मैदानावर खेळला होता तर भारताने हा सामना डाव आणि ७५ धावांनी जिंकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER