IND vs AUS: MCG मध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात CA ने वाढवली दर्शकांची संख्या, इतक्या लोकांना मिळेल एन्ट्री

Melbourne Cricket Ground - MCG

मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात दररोज ३०,००० प्रेक्षक उपस्तिथ असतील.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आता कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. या कसोटी मालिकेची सुरूवात एडिलेडमधील डे-नाईट टेस्टने १७ डिसेंबरपासून होईल. त्यानंतर पुढची कसोटी मेलबर्न येथे खेळली जाईल. मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळल्या जाणार्‍या बॉक्सिंग डे कसोटीमुळे दररोज ३०,००० प्रेक्षकांना सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. ही कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना असेल.

CA ने वाढवली दर्शकांची संख्या
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) ट्विट केले की, “आम्ही MCG मध्ये बर्‍याच दर्शकांचे स्वागत करण्यास तयार आहोत. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांत संख्या वाढवून दररोज ३०,००० प्रेक्षक केले गेले आहेत. आम्हाला आनंद आहे की आम्ही MCG वर बर्‍याच दर्शकांचे स्वागत करू. विशेषतः जेव्हा हे वर्ष व्हिक्टोरियासाठी खूप आव्हानात्मक होते.

यापूर्वी CA ने कोविड -१९ मुळे दररोज MCG ची प्रेक्षकांची मर्यादा २५,००० निश्चित केली होती. एडिलेड ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्यात स्टेडियममधील ५० टक्के प्रेक्षकांना दररोज स्टेडियमवर जाण्याची परवानगी दिली जाईल.

तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) खेळला जाईल. या स्टेडियमला ५० टक्के प्रेक्षकांनाही परवानगी आहे. हा सामना ३ ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान खेळला जाईल. चौथा कसोटी सामना १५ ते १९ जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळला जाईल. या स्टेडियमवर दिवसाला ३०,००० प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER