IND vs AUS: बुमराहने IPL मध्ये केली अप्रतिम कामगिरी, एकदिवसीय मालिकेवर असेल नजर

Jasprit Bumrah

यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ज्या प्रकारे प्रदर्शन केले आहे ते भारतीय संघासाठी फायद्याची बाब आहे, पण त्याची खरी कसोटी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत असेल. IPL -१३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोविड -१९ (COVID-19) मुळे लॉकडाउन (Lockdown) होण्याआधीही बुमराह टी -२० मध्ये चांगली कामगिरी करत होता, पण एकदिवसीय सामन्यात त्याचा फॉर्म चिंताजनक आहे. थोडक्यात सांगायचे तर बुमराह यावर्षी एकदिवसीय सामन्यात त्या प्रकारे विकेट टेकर म्हणून दिसला नाही जसा तो दुखापतीआधी होता.

उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला मागील वर्षी पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता, त्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडीज दौर्‍यापासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले तेव्हा टी -२० आणि एकदिवसीय सामन्यात त्याचा फॉर्म अगदी वेगळा होता.

बुमराहने आठ टी -२० सामन्यांत आठ विकेट्स घेतल्या आणि त्यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट ६.३८ होता जो त्याच्या करिअरच्या इकॉनॉमी रेटपेक्षा चांगला होता, पण एकदिवसीय सामन्यात विकेट घेण्यास त्याला संघर्ष करावा लागला. सहा एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त एक विकेट मिळाला आणि त्याने प्रत्येक षटकात ५.१ च्या दराने धावा दिल्या, जे त्याच्या कारकीर्दीतील एकदिवसीय सामन्यातील ४.५५ च्या इकॉनॉमी रेटपेक्षा किंचित जास्त आहे.

माजी वेगवान गोलंदाज मदन लाल जो भारताच्या १९८३ च्या विश्वविजेते संघाचा सदस्य होता त्यानेही बुमराहचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की IPL मध्ये कोणीही त्याला सहजपणे खेळू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER