IND vs AUS Brisbane Test: पहिले अजिंक्य रहाणे आणि नंतर चेतेश्वर पुजाराने मार्नस लबुशेनचा सोडला झेल

भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाच्या खराब फिल्डिंगचा फटका संपूर्ण संघाला सहन करावा लागला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणी रोहित शर्माच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे रोमांच निर्माण झाले. काही कॅच गहाळ झाल्यामुळे भारतीय छावणीत निराशा होती.

रहाणेने सोडला झेल

नवदीप सायनेने जेव्हा ३६ व्या षटकातील ५ वा चेंडू टाकला तेव्हा मार्नस लबुशेनने चेंडूला गली क्षेत्राच्या दिशेने ठोकले. तेथे फिल्डिंगसाठी उपस्थित असलेल्या अजिंक्य रहाणेने मोठी चूक केली. त्याने एक साधा झेल सोडला. त्यावेळी लबुशेन ३७ च्या वैयक्तिक धावांवर होता.

पुजाराकडूनही झाली चूक

टी. नटराजनने ४६ व्या षटकातील ५ वा चेंडू टाकला तेव्हा लब्यूशेन ४८ च्या वैयक्तिक धावांवर फलंदाजी करीत होता. चेंडू त्याच्या बॅटला लागून स्लिपवर पोहोचला. पुजाराने डाईव्ह मारली पण झेल पकडण्यात अपयशी ठरला.

लबुशेनचे शतक

रहाणे आणि पुजाराने मार्नस लबुशेनचा झेल सोडला नसता तर ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज आपले ५ वे कसोटी शतक झळकावण्यात यशस्वी झाला नसता. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका संपूर्ण टीम इंडियाला सहन करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER