
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान एडिलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी टीम इंडियाला (Team India) त्यांच्या विरोधी संघातील खेळाडूंसाठी मोठी आघाडी मिळवायची आहे.
एडिलेड ओव्हल येथे खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. टीम इंडियाकडून मयंक अग्रवाल(९) आणि चेतेश्वर पुजारा यांनी (०) आणि बुमराह (२) धावा करून बाद झाले. भारताची धावसंख्या -१५ / ४ (दुसरा डाव)
कर्णधार विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मोठ्या आशेने पाठवले होते, परंतु तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. त्याला पॅट कमिन्सने २ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
चौथ्या क्रमांकावर आलेला पुजारा धाव न करताच बाद झाला. त्याला पॅट कमिन्स ने बाद केले. मयांक अगरवालही जास्त काळ टिकून राहू शकला नाही. त्याला हॅझेलवूड ने ९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला