लॉकडाउन वाढवणे आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल – आनंद महिंद्रा

Anand Mahindra

मुंबई : महिंद्रा उद्योग समूहाचे लॉकडाउन वाढवण्याच्या शक्यतेबाबत – लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात या शब्दात काळजी व्यक्त केली आहे.

मात्र, कधी – कधी अपरिहार्य असतो असे सूचित करताना, याबाबत प्रशासनासमोर असलेले पर्याय सुद्धा तितके सोपे नाहीत हे त्यांनी मान्य केले.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी एका लेखाचा दाखला दिला आहे. ज्या लेखात कोविड-१९ ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढवणार नाही तर त्यामुळे दुसरे गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकते’ असे आनंद महिंद्रा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“लॉकडाउन आणखी बऱ्याच काळासाठी वाढवला तर आर्थिक हाराकिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते” असे आनंद महिंद्रा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते. “लॉकडाउनमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील पण लॉकडाउन वाढला तर मात्र समाजातील कमकुवत घटकांच्या अडचणींमध्ये वाढ होईल” असे त्यांनी लिहिले होते.

देशात सध्या चौथा लॉकडाउन सुरू आहे. पण अजूनही करोनाची साथ कमी होत नाही. देशात रोज करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. देशभरातील करोनारुग्णांची संख्या एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८४५ पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात कोरोनाचे ६ हजार ९७७ नवे रुग्ण आढळले आहेत व १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER