आमदारांचा निधी वाढवला, मात्र सामान्य जनतेला एकही रुपया नाही – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे : कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन (Lockdown) आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी विकेंड लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजनांचा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपसह मनसेनंही घेतलाय. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन, कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला एक रुपयाही दिला नाही, अशी टीका केली.

राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण आतापर्यंत सर्व सामान्य लोकांना एक रुपयाही दिला नाही. सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर करा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्य सरकारला विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यात सर्वसामान्य नागरिकांना पॅकेज देण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. त्याबाबत सरकार काय करणार? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यात पीएमपीएमलची बस सेवा बंद करण्यात आली आहे. मग कामगार वर्ग, सामान्य माणसाने प्रवास कसा करायचा? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

राज्य सरकारने कोणत्याच घटकातील एकाही व्यक्तीला आर्थिक मदत केलेली नाही. आमदारांना न मागता निधी वाढवून दिला. आमदार पळून जाऊ नयेत म्हणून निधी वाढवला. हीच मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना करायला हवी होती, असं पाटील म्हणालेत.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना चंद्रकांत पाटील यांनी एक आव्हान दिलं. दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागल मतदारसंघात मतांचं विभाजन करुन ते निवडून येतात. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफांना दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button