
मुंबई :- राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं (Thackeray Government) घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रविण दरेकर (Pravin Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बातमी पण वाचा : सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेचं ‘पेंग्विन गेम्स’ लाँच
सर्वात मोठी बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दिग्गज नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असली तरीही राज्य शासनाने एकूण १३ जणांना नव्या वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला असून त्यात प्रामुख्याने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा समावेश आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे ”माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…असं म्हणत देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 11, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला