ऑक्सिजनचे उत्पादन वाढवा, टँकर्स सुसाट सोडा; पंतप्रधानांचे आदेश

PM Narendra Modi

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा उद्रेक आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सध्याचा ऑक्सिजन साठा, निर्मिती आणि पुरवठ्याची माहिती घेतली.

यावेळी बैठकीला आरोग्य मंत्रालय, स्टील मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयासह विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी सर्व मंत्रालयांना राज्य सरकारांसोबत योग्य प्रकारे समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

पंतप्रधानांनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त असलेल्या १२ राज्यांमध्ये पुढील १५ दिवस ऑक्सिजन पुरवठा कसा होईल, याची माहिती घेतली. राज्य आणि वाहतूकदारांना ऑक्सिजनची ने-आण करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिले. शिफ्टमध्ये ड्रायव्हर्सची ड्युटी लावून २४ तास टँकरसह सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर सिलेंडर भरले जाणाऱ्या प्लांटमध्ये २४ तास काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button