1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या टोलदरात वाढ

Toll Rates - Mumbai

मुंबई :- मुंबईकरांना १ ऑक्टोबरपासून टोलचा झटका बसणार आहे. मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलच्या दरात (Toll Rates) ५ ते २५ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. मुंबईत खासगी वाहनांनी ये-जा करणाऱ्यांना वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक कंबरडे मोडले असतानाच मध्यमवर्गीयांना आता टोलच्या रुपात आणखी एक आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेले नवे दर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू असतील.

मुंबईच्या (Mumbai) मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे. एमएमआर भागातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्ये रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार आणि जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ होऊन टोल आता ४० रुपये होणार आहे. हलक्या वाहनांचा मासिक पासमध्येही १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मासिक पास आता १४०० रुपयांवरुन १५०० रुपये होणार आहे.

टोल आकारणी अशी असणार…

छोटी वाहनं – आधी ३५ रुपये, आता ४० रुपये
मध्यम अवजड वाहनं – आधी ५५ रुपये, आता ६५ रुपये
ट्रक-बसेस – आधी १०५ रुपये, आता १३० रुपये
अवजड वाहनं – आधी १३५, आता १६० रुपये
हलक्या वाहनांचा मासिक पास – आधी १,४०० रुपये, आता १,५००रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER