इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Aurangabad Bench - Bombay High Court - Indurikar Maharaj

अहमदनगर : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar Maharaj) यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर कोर्टाने दिलासा दिला. मात्र, इंदोरीकर महाराजांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंदोरीकर यांच्या विरोधात आता हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench – Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केले होते. यावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे.

लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. त्यानंतर, आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंधश्रद्धा निर्मुलन समितीने इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केले आहे, याची माहिती समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी दिली आहे.

मकं प्रकरण काय?
“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.” असे वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावले होते. तसेच याचे स्पष्टीकरण मागितले होते. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button