सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या भत्त्यात वाढ

सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या भत्त्यात वाढ

नवी दिल्ली :- माजी सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) निवृत्त न्यायाधीश यांना सेवानिवृत्तीनंतर निवासस्थानी एक हरकाम्या नोकर (Orderly), स्वीय सहायक आणि ड्रायव्हर नेमण्यासाठी तहहयात दिल्या जाणार्‍या मासिक भत्त्यात केंद्र सरकारने (Central Government) भरघोस वाढ केली आहे.

माजी सरन्यायाधीशांना सध्या मिळणारा हा मासिक भत्ता २५ हजार रुपये होता. तो आता वाढवून ७० हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा हा भत्ता १४ हजार रुपयांवरून वाढवून ३९ हजार रुपये करण्यात आला आहे.

यासाठी १९५९ च्या ‘सुप्रीम कोर्ट जजेस रुल्स’मध्ये सुधारणा करणारी अधिसूचना शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. सन २००६ नंतर या भत्त्यात प्रथमच वाढ करण्यात आली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER