पेट्रोल डिझेलसह घरगुती गॅस दरात वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ गुरुवारी झाली. तसेच विना अनुदानित गॅस सिलेंडर दरातही 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 59 डॉलर्स प्रती बॅरलवर पोहोचले आहेत.

त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्याकडून सांगण्यात आले आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 86.65 रुपयांवर गेले आहेत. डिझेलचे दर देखील 35 पैशांनी वाढून 76.83 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 93.20 आणि 83.67 रुपयांवर गेले आहेत. चेन्नईमध्ये हेच दर अनुक्रमे 89.13 आणि 82.04 रुपयांवर तर कोलकाता 88.01 आणि 80.41 रुपयांवर गेले आहेत.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी विना अनुदानित गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरचे दर 719 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकाता येथे हेच दर 745.50 रुपयांवर गेले असून मुंबईत ते 710 रुपये तर चेन्नईमध्ये ते 735 रुपयांवर गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER