‘छपाक’ सिनेमाच्या अडचणीत वाढ, लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाची कोर्टात धाव

Increase in difficulty of Chhapak cinema-Lakshmi Aggarwal lawyer files-plea

मुंबई : दीपिका पदुकोण स्टारर ‘छपाक’ हा चित्रपट उद्या १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे .अ‌ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने चित्रपटात क्रेडिट न दिल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात मागणी केली आहे. वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, अ‌ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असं असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आलं नाही.

‘निरमा’च्या जाहिरातीवरून अक्षयविरोधात तक्रार दाखल

याचविरुद्ध भट्टने दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.

छपाक हा सिनेमा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रावलच्या हिच्या संघर्षावर आधारित आहे. अपर्णा भट या लक्ष्मी अग्रवालच्या वकील आहेत. लक्ष्मीला न्याय मिळवून देण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. अनेक वर्षं त्यांनी लक्ष्मीची केस लढली. याशिवाय या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्यातही त्यांनी बरीच मदत केली होती. मात्र या सिनेमात त्यांना कोणत्याही प्रकारचं क्रेडिट दिलं गेललं नाही. असं अपर्णा यांचं म्हणणं आहे. अपर्णा भट यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यांनी छपाकच्या मेकर्सवर नाराज असल्याचा उल्लेख केला आहे.