राज्यात ‘सिझेरियन’ने प्रसूती करण्याच्या प्रमाणात वाढ

Increase in cesarean delivery in the state
  • राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातील ताजी आकडेवारी

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये गरोदर महिला नैसर्गिकपणे प्रसूत होण्याऐवजी  ‘सिझेरियन’ (Cesarean) शस्त्रक्रिया करून त्यांची प्रसूती करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे कौटिंबिक आरोग्यासंबंधीच्या राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या ताज्या आकडेवारीवरून दिसते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबककल्याण मंत्रालयाने यंदाच्या वर्षी केलेल्या ‘राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणा’च्या (National Family Health Survey) पाचव्या फेरीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. यंदा या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा, कोरोना महामारीचे संकट येण्याआधी महाराष्ट्रासह १७ राज्ये व काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण होऊ शकला होता. राहिलेले सर्वेक्षण कोरोनाचे निर्मलन झाल्यानंतर केले जाईल,

पहिल्या टप्प्याच्या सवेत्रणात महाराष्ट्राचा समावेश होता  सवेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार माहाराष्ट्रातील ‘सिझेरियन प्रसूतीं’चे प्रमाण वाढत आहे. बाळंतपण गरी न करता त्यासाठी इस्पितळात जाण्याचे प्रमाणे सन २०१५ १६ मध्ये ९०.३ टक्के होते ते यंदा वाढून ९४७ झाले. मात्र त्याच बरोबर ‘सिझेरियन’ प्रसूतींचे प्रमाणही याच काळात वाढून २० टक्क्यांवरून २५. ४ टक्के झाले. खासगी इस्पितळांमध्ये होणाºया प्रसूतींमध्ये ‘सिझेरियन’चे प्रमाण २०१५-६ मध्ये ३३ टक्के होते ते यंदा वाढून ३९ टक्के झाले.

तेलंगण, प. बंगाल, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या अन्य मोठ्या राज्यांमध्येही हेच चित्र दिसते. या राज्यांमध्ये खासगी इस्पितळांमध्ये ‘सिझेरियन’ने होणाºया प्रसूतींचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. बºयाच राज्यांमध्ये ते ५० टक्क्यांहून अधिक असल्याचेही आकडेवारीवरून दिसते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियांचे १० ते १५ टक्के हे प्रमाण आदर्श मानतात. सबळ वैद्यकीय कारण असेल तर ‘सिझेरियन’ प्रसूतीने स्त्रियांचे बाळंतपणातील मृत्यूचे व  बाळाच्या जन्मजात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असेही तज्ज्ञ मानतात.

मुंबईतील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस’चे (IIPS) संचालक डॉ. के. एस. जेम्स यांनी ‘सिझेरियन’ प्रसूती आणि त्याही खासगी इस्पितळांमध्ये वाढत असल्याविषयी चिंता व्यक्त केली. त्याच संस्थेतील सार्वजनिक आरोग्य व नैतिकता या विभागाच्या प्राध्यापिका डॉ. उषा राम यांनी याची दुसरी बाजूही स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, खासगी इस्पितळांची पैसे उकळण्याची प्रवृत्ती हेही एक कारण असू शकते. पण हेही लक्षात घ्यायला हवे की, हल्ली स्त्रियांना दीर्घकाळ प्रसूतीकळा सोसण्याचा सोशिकपणा राहिलेला नाही. तशा वेळी त्यांना धीर देणाºयाही पूर्वीप्रमामे राहिलल्या नाहीत. शिवाय कुटुंबातील मुलांची संख्याच कमी झाल्याने जी काही एक-दोन मुले होऊ द्यायची ती ‘सिझेरियन’ने जन्माला घालणे पालकांना अधिक सोयीस्कर व परवडणारे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER