मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्या वाढवा; देवेंद्र फडणवीसचे आवाहन

Devendra Fadnavis

वर्धा :- मुंबईसह राज्यातील कोरोना (Corona) चाचण्यांची संख्या खूप कमी आहे. चाचण्या आणखी वेगाने वाढवावी (Increase corona tests), असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिले आहे. यात त्यांनी टेस्टिंगची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. आज पुन्हा फडणवीसांनी त्याचा पुनरुच्चार केला.

देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हाच्या सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात रोज ६५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह इतर राज्यात कोरोना चाचण्या कमी होत आहेत. चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी, असे मागणी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. तसेच मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. कुठेतरी मृतांचा आकडा लपवण्यात येत आहे. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे, असे फडणवीस म्हणाले.

लॉकडाऊनबाबत वेट अँड वॉच

राज्यात लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. यावर चर्चादेखील सुरू आहे. याबाबत तुमची काय भूमिका आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. यावर उत्तरेत देताना ते म्हणले की, “वेट अँड वॉच… लॉकडाऊनवर आताच काही बोलणार नाही. सरकार काय निर्णय घेते, त्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. मात्र, लॉकडाऊनबाबत आम्ही जनतेच्या सोबत आहोत.” सोबतच त्यांनी लॉकडाऊनला विरोध करण्याचे संकेतही दिले.

ICU बेड्स वाढवा

दरम्यान, वर्ध्यात ICU बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिनचा पुरवठा आणि मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे, असे फडणवीसांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी चर्चा करून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.

ही बातमी पण वाचा : आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button