यापुढेही राष्ट्रवादीत इनकमिंग होत राहील; नामांतराशिवाय इतरही मुद्दे आहेत; अजित पवार डाफरले

Ajit Pawar
  • राष्ट्रवादीतील इनकमिंग, औरंगाबाद नामांतर, मेहबूब शेखवरील बलात्काराचा आरोप यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात बोलत असताना पक्ष, पक्षातील नेत्यांशी संबंधित चालत असलेल्या ताज्या विषयावर त्यांनी भाष्य केले आहे. तसेच, औरंगाबाद नामांतराचा विषय सारखाच रेटण्यावरूनही त्यांनी आपली तडकफडक प्रतिक्रिया दिली.

औरंगाबादच्या नामांतरावर आतापर्यंत शांततेने प्रतिक्रिया देणारे, नामांतराचा विषय सामोपचाराने सोडवू असेच म्हणून या विषयाची तीव्रता कमी करणारे अजित पवार आज चांगलेच डाफरले. “नामांतराव्यतिरिक्तही राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं आहे. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षांचे  नेते एकत्रित बसून सोडवतील, असं म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली.

राष्ट्रवादीत इनकमिंग

राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू आहे. यावर अजित पवार म्हणाले, राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होताहेत. मात्र पुढचे काही पक्षप्रवेश होताना प्रवक्ते हे माध्यमाला सांगतील. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे पुढच्या काळात पक्षप्रवेश होतील, असं सूचकपणे अजित पवार यांनी सांगितलंय.

मेहबूब शेख यांच्यावरील आरोप तथ्यहीन

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांत तक्रारदेखील दिली. त्यानंतर शेख यांनी सर्व आरोप फेटाळले. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनीही शेख यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मेहबूब यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. मेहबूबवर झालेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. पोलीस तपासात योग्य माहिती समोर येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER