राष्ट्रवादीत इन्कमिंगचं सुरुच, माजी महापौरसह वंचितच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Incoming To NCP - Jayant Patil

मीरा भाईंदर : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात इन्कमिंगचे सत्र सुरुच आहे. मीरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ बांधले. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) पधाधिकाऱ्यांनीही पक्षप्रवेश करुन हाती घड्याळ बांधून घेतले.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांच्या घरवापसीला सुरूवात झाली आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गेल्या वेळी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला अलविदा करुन भाजप (BJP), शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

यावेळी माजी आमदार हरिदास भदे (Haridas Bhade) यांच्या पुढाकाराने नागपूरमधील धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र थोटे, भोई समाज बहुद्देशीय फाऊंडेशनचे बंडुभाऊ सुरजुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मीरा भाईंदरच्या काशीमिरा हायवे पट्ट्यातील शिवसेनेचे नेते मेंनेंजीस सातन यांनी शिवसेनेला (Shiv Sena) राम राम ठोकला. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

याआधीही शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांच्या पक्षात उड्या मारल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रयोगानंतर अशा पक्षांतराकडे राजकीय वर्तुळात गांभीर्याने पाहिले जात आहे. विशेषतः शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पारनेरच्या नगरसेवकांवरुन मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER